मी नसेल जेव्हा ,
आठवेन ना रे तुला मी
कपाटातल्या साडीच्या घडीत
नी बांगड्यांच्या किनकिनाटात,
स्वयंपाक घरातून येणाऱ्या
त्या चहाच्या सुगंधात
मी नसेल जेव्हा ,
आठवेन ना रे तुला मी
अंगणात उभ्या असलेल्या
तुळशीवृंदावनात,
नी सांजवेळी लावलेल्या
देवापुढच्या निरांजनात
मी नसेल जेव्हा ,
आठवेन ना रे तुला मी
अंगणात रेखाटलेल्या
ठिपक्यांच्या रांगोळीत,
नी दारावर लावलेल्या
तोरणांच्या विणीत
मी नसेल जेव्हा ,
आठवेन ना रे तुला मी
हातावर काढलेल्या
रेखीव मेहंदीत
नी केसांमध्ये माळलेल्या
मोगऱ्याच्या वेणीत
मी नसेल जेव्हा ,
आठवेन ना रे तुला मी
प्रसन्न सकाळी
चहाच्या वेळी
नी रात्री उशीवर डोकं ठेवून
झोपेच्या आधीन होण्याआधी
मी नसेल जेव्हा ,
खरेच नक्की आठव मला तू
दुखाःच्या त्या वेळी
जेव्हा सोबतीला नसेल कोणी,
नी सुखाच्या त्या क्षणी
जेव्हा चेहऱ्यावर असेल हसू नी डोळ्यात असेल पाणी
आठवेन ना रे तुला मी
कपाटातल्या साडीच्या घडीत
नी बांगड्यांच्या किनकिनाटात,
स्वयंपाक घरातून येणाऱ्या
त्या चहाच्या सुगंधात
मी नसेल जेव्हा ,
आठवेन ना रे तुला मी
अंगणात उभ्या असलेल्या
तुळशीवृंदावनात,
नी सांजवेळी लावलेल्या
देवापुढच्या निरांजनात
मी नसेल जेव्हा ,
आठवेन ना रे तुला मी
अंगणात रेखाटलेल्या
ठिपक्यांच्या रांगोळीत,
नी दारावर लावलेल्या
तोरणांच्या विणीत
मी नसेल जेव्हा ,
आठवेन ना रे तुला मी
हातावर काढलेल्या
रेखीव मेहंदीत
नी केसांमध्ये माळलेल्या
मोगऱ्याच्या वेणीत
मी नसेल जेव्हा ,
आठवेन ना रे तुला मी
प्रसन्न सकाळी
चहाच्या वेळी
नी रात्री उशीवर डोकं ठेवून
झोपेच्या आधीन होण्याआधी
मी नसेल जेव्हा ,
खरेच नक्की आठव मला तू
दुखाःच्या त्या वेळी
जेव्हा सोबतीला नसेल कोणी,
नी सुखाच्या त्या क्षणी
जेव्हा चेहऱ्यावर असेल हसू नी डोळ्यात असेल पाणी
Too cute
ReplyDeleteAmit shete
छान जमून आलीये..
ReplyDeleteआणखी भामची मिसळ राहिली.. :)
tashya baryach goshti rahilyat
DeleteMast...
ReplyDeleteLast stanza 👌
ReplyDeleteअप्रतिम 👌
ReplyDelete