गिरवली… माझं आजोळ. काल आजोळी जाणं झालं. निमित्त माझी आजी जावून साडे पाच महिने झाले. माझी आजी… मायेचं आभाळ या खेरीज तिला उपमा नाही. तिची आठवण झाली की कितीतरी गोष्टी झरझर डोळ्यांपुढे येतात आणि फेर धरतात. यशोदा तिचं नाव. तसं कृष्णाची मैय्या यशोदा आणि आमची आजी यशोदा दोघींमध्ये फारसा फरक नाही. दोघीही मुलखाच्या मायाळू.
तर काल माझ्या आजीच्या गावात-गिरवलीला जाणं झालं. या गावाशी माझी कमालीची भावनिक गुंतागुंत आहे. गिरवली नाव घेतलं तरी लगेच आठवतो तो घरामागाचा डोंगर ज्यावर उन्हाळ्याच्या सुट्टीत आम्ही करवंद तोडून खायला जायचो, तो ओढा ज्याच्या काठावरच्या बोरीच्या झाडाची बोर वेचायला आम्ही जात असू, ते वडातलं भैरवनाथाचं मंदिर जिथून शेतात जाताना आम्ही आजीमागे चपला हातात घेवून भैरवनाथाची वेस पार करायचो, ती चाम्भाराची विहीर जिचं पाणी एकावर एक हंडे घेवून आम्ही भरायचो, तो माळरान जिथे जशी संध्याकाळ गर्द होई तसा आमच्या गप्पांना रंग चढे, ते अंगण जिथे रात्री चांदण बघत भुतांच्या गोष्टी ऐकायचो आणि घाबरून आजीने शिवलेली उबदार गोधडी तोंडावर घेवून झोपी जायचो. किती भाग्यवान आहोत आम्ही, या सागळया गोष्टी आम्हाला अनुभवायला मिळाल्या. फुलपाखरांमागे धावायला मिळाल, शेतात झाडाखाली जेवायला मिळाल, विहीरीच पाणी चऱ्हाटाने ओढायला मिळाल, पाटाच्या पाण्यात भिजायला मिळाल, नदीतले शंख शिंपले गोळा केले, ओढ्यातले छोटे मासे ओंजळीत धरले या आणि अश्या कित्तेक लाखमोलाच्या गोष्टी सगळ्यांच्याच वाट्याला येत नाहीत. मागच्या सुंदर आठवणी आठवत काल पुन्हा एकदा तो गिरवलीचा डोंगर चढायचा योग आला.
डोंगरावर गेले तेंव्हा पावसाचे दिवस सरत आले होते त्यामुळे पाऊस तर नव्हता पण पावसाने आपली हिरवी जादू मात्र डोंगरावर चालवली होती. हिवाळ्यात डोंगरावरच्या पांढऱ्या फुलांनी पांढुरका दिसणारा, उन्हाळ्यात पिवळट - सोनेरी दिसणारा डोंगर आता मात्र हिरवागर्द झाला होता. आम्ही आजोळी जायचो ते फक्त दिवाळी आणि उन्हाळी सुट्टीत म्हणून या डोंगराचं हे रूप मी आजवर कधीच पाहिलं नव्हत.
डोंगरावर सगळीकडे हिरवळ माजली होती. आणि मधेच बहरलेली रंगीत रानफुले उठून दिसत होती. पायथ्याला डोंगरावरून आलेले छोटे छोटे झरे खळाळू लागले होते. आणि खळ-खळ आवाज करत ओढ्याला जावून मिळत होते. ओढ्यातले छोटे छोटे मासे मध्येच आपलं डोक वर काढीत होते. पाननिवळी पाण्यावरून इकडून तिकडे लगबगीने फिरत होत्या.
डोंगरावरची छोटीशी सुंदर वळणावळणाची डांबरी वाट दुतर्फा हिरव्या झाडीमुळे अजूनच सुंदर वाटत होती. सागवानाच्या पांढरट तुऱ्यानी झाडाला घेराव घातला होता. केशरी-गुलाबी रंगाची फुलं ल्यालेली टनटनी फुलपाखरांना खुणावत होती. रंगीबेरंगी फुलपाखरांना तर या फुलावरून त्या फुलावर उडण्यापासून उसंत नव्हती. करवंदीची काटेरी जाळी आपापल्या जागा धरून उभी होती. निवडूंगानी जिथे जमेल तिथे हात पाय पसरले होते.
मध्येच पक्ष्यांच्या किलबिलाटावर मात करून मोराचा केकारव डोंगरात घुमे आणि आपलं या डोंगरातलं अस्तित्व सिद्ध करी. पठारावरती काही मेंढपाळाची मेंढरं गवताच्या लुसलुशीत गादिवर लोळण घेत होती.
मध्येच पावसाची भुरभूर येई तर मध्येच सोनेरी उन पडे असा पाठशिवणीचा खेळ चालूच होता.पावसाचं पाणी काही खडकांमधून पाझरत होत. ते नीर-बिंदू झऱ्याला मिळण्याची धडपड करत होते. सागवानाच्या मोठ्या पानांवरचे पावसाचे थेंब रविकिरणांमुळे मधूनच चमकत होते.
अशा समृद्ध वातावरणात येवून स्वर्ग स्वर्ग तो याहून वेगळा काय असावा असं वाटलं आणि त्याचवेळी परतीची वेळ झाली आहे हे लक्षात आलं.

Wah wah...lai bhari
ReplyDeletedhanyawaad arun bhawu
ReplyDeleteKhup chan tai.. jamatay ki tula.!!!
ReplyDeleteKhup chan...
ReplyDeleteChhan lihites...ajun lihi...shabdamadhe pragalbhata aalu pahije....sambhaji
DeleteThanks sambha dada. I will try to improve
Deleteखुप छान गीतू.
ReplyDeleteThank you taju
ReplyDelete