Tuesday 11 September 2018

आठवणी त्या रानफुलांच्या

जावू तेव्हा आपुल्या आठवणी 
मनात घर जातील करुनी 
सुख दुःखातील भागीदारी 
सहज अशी हि न संपणारी

मन हे विव्हळेन करेन तांडव 
घडेल मनस्मृतींचे दर्शन 
गतकालातील चित्रे रंगीन 
डोळ्यांसमोरून जातील तरळून

कधी रडणारे कधी रुसणारे 
आठवतील ते हसरे चेहरे
भांडणात त्या स्नेहची दडला 
सांगा कुणा मी कसे विसरावे

तळमळणाऱ्या तडफडणाऱ्या 
आनंदाने बागडणाऱ्या 
दिक्कालातून येतील परतून 
आठवणी त्या रानफुलांच्या 

4 comments:

  1. कोण देते खतपाणी त्या रानफुलांना
    त्रीणि आनंद देते पहाणार्यांच्या मनांना
    खंत नाही कालान्तरे मुरझून जाण्याचा
    सुखं दु:ग ना त्यांच्या उमलण्याचा

    चिरंतन आठवण मात्र रहाते पहाणार्याच्या मनाना

    जशी आठवण राहिली त्या रानफुलांची तुला
    तशी आठवण राहील तुझ्या कवित्वाची मला

    ReplyDelete
    Replies
    1. खूप सुंदर लिहिता तुम्ही

      Delete