पुर्णविराम...... एका आयुष्याला. त्याच्यातल्या चेतनेला. पुर्णविराम..... त्या आशेला जिथे माहित असतो कि पुर्णविराम आहे, पण कधी हे काळाच्या हातात. पुर्णविराम......त्या झुंजीला जी मृत्युसोबत चालली होती. पुर्णविराम...... पुर्णविराम...... पुर्णविराम मात्र कधीच नसतो त्याच्या आठवणीला.
जगातलं जर सगळ्यात मोठ कुठलं दुःख असेल तर ते म्हणजे आपल्यासमोर आपली जवळची व्यक्ती मृत्यूशी झुंज देतेय, आणि आपण मात्र हतबल होऊन फक्त बघ्याची भूमिका घेण्यापलीकडे काही करू शकत नाही. ती व्यक्ती केविलवाणे भाव डोळ्यांत दाटून आपल्याला विनवणी करतेय कि मला वाचवा मला अजून जगायचंय पण आपण इच्छा असूनही काहीच करू शकत नाही. मग जाणीव होते आपल्या थिटेपणाची. आपण किती क्षुद्र आहोत याची.
नकोसे वाटतात ते दवाखाने जिथे प्रत्येक मन अस्वस्थ, बेचैन असतं. जिथे माणसाच्या प्राणांची शाश्वती नसतानाही वेडी आशा उरी बाळगताना दिसते. जिथे काहीच आशा नसताना देखील आपल माणूस खाटेवर पडून फक्त श्वास घेण्याइतपत तरी जिवंत असावं अस वाटत.
हा प्रसंगच असा कि दैव आपल्याला क्षणोक्षणी त्याच्या सामर्थ्याची जाणीव करून देत असतो. आपण किती क्षुद्र आहोत हे तो दाखवून देत असतो. ती ICU मधली खाट. त्याच्यावर जगायची इच्छा असणारा तो मनुष्य. विनवण्या करतोय कि देवा मला अजून एक संधी दे फ़क्त. मी तिचे सोने करेन. पण देव मात्र निश्चल, आपल्या निर्णयावर ठाम.
ICU बाहेर अनेक डोळे दाराकडे टक लावून बसलेले. उरी हतबलता. डोळ्यांत दाटलेले अश्रुंचे ढग कसे बसे थोपवलेले. ते आता बरसतील मग बरसतील हि स्थिती. काळजीच मणभर ओझं मनावर लादलेलं. सर्वत्र भीतीच वातावरण. आतली व्यक्ती उद्या आपल्यात नसेल ही भिति, तिचे सवयीचे बोल पुन्हा कधीही ऐकू येणार नाही ही भिति, तिचा सहवास संपेल ही भीती, तिच्याशिवाय जगण ही भीती, कायमचा दुरावा ही भीती.
अशा वेळीही आशेचा किरण कुठेतरी डोकावत असतो. काहीतरी चमत्कार घडेल आणि आपलं माणुस सुखरूप पुन्हा आपल्यात असेल अस वाटत असत. वाटत कि पैसा ऐशोरम काही नको फक्त या माणसाची साथ मला अजून लाभू दे. मग आपल्या शक्तीपलीकडच्या गोष्टींसाठी धावा सुरु होतो, त्या दैवशक्तीचा, आपल्या श्रद्धास्थानाचा. प्रत्येक मनात प्रार्थनेची गर्दी.
आतमध्ये डॉक्टरचं लक्ष त्या एका रेघेकडे.तिला जोपर्यंत चढ-उतार आहेत तोपर्यंत प्रयत्नांची पराकाष्ठा. चढ-उतार संपून जेव्हा राहते फक्त एक सरळ रेघ तेव्हा थांबतात हात. जीव वाचवायचा प्रयत्न करणारे हात. नी सुरु होते शब्दांची जुळवाजुळव. बाहेर वाट बघणार्यांना सामोरं जाण्यासाठी लागणाऱ्या धैर्याची जुळवाजुळव.
नंतर माजतो तो कोहराम, तो आक्रोश. अन राहतात फक्त न थांबणारे अश्रु, हृदय हेलावणारे टाहो नि हुंदके.

Nice one .. good.. besr
ReplyDeleteमनाला सुन्न करणारे क्षण.
ReplyDelete