Sunday, 31 August 2014

कॉलेज डेज

अवनीश… माझा दोन वर्षांचा मुलगा. दुपारी झोपला होता. घरातलं सगळ काम तर आवरल होत. विचार केला की त्याचे जुने फोटो पहावेत. अगदी लहान असताना खुपच गोजिर बाळ दिसायचा तो. फोटो कॉपी केलेली हार्ड डीस्क काढली आणि पाहायला सुरुवात केली. त्यात "कॉलेज डेज" नावचं एक फोल्डर मला दिसलं.

फोल्डर पाहूनच अंगावर रोमांच उभे राहिले. कसे होते ते दिवस. आठवलं तरी कालचक्र उलट फिरावं आणि "कॉलेज डेज" मध्ये जावून थांबावं नी थांबूनच रहावं अस वाटत.

त्या सगळ्या गोष्टी आठवल्या. बर्थडे सेलेब्रेशन्स आठवली, पोकेट मनी कमी म्हणून चायनीज स्टोल वर जावून दिलेली बर्थडे ट्रीट आठवली, मोंजीनीजचा तेव्हा खूप महागडा वाटणारा केक खूप महाग आहे म्हणून नासधूस न करता गप्प बसून खावून संपवलेला आठवला, एक्झाम्स आठवल्या, सबमिशन्स आठवले, अभ्यासाचा वेळोवेळी चढणारा आणि लगेच उतरणारा क्षणभंगुर ताप आठवला, या आणि अशा बऱ्याच गोष्टी आठवल्या.

तशी मी पापभीरू. पण माझ्या मित्र-मैत्रिणींच्या कृपेमुळे लेक्चर बंक करून कुठेतरी उन्हातान्हात हुंदडायला जाणं, कॅंटीन मध्ये बसून नुसत्याच चकाटया पिटण, अधून मधून सिनेमाला जाणं अशा कित्येक गोष्टी मीही शिकले. सुरुवातीला भीत भीत लेक्चर बंक करणारी मी मित्र-मैत्रिणींच्या प्रोत्साहनामुळे अगदी सराईतासारखी बिनधास लेक्चर बुडवू लागले.

वर्षभर अभ्यास न करता अभ्यासाच्या नावावर गप्पा मारत बसण हे तर सवयीचं झालं. आणि परीक्षेच्या दिवसात पुढच्या सेमिस्टर मध्ये सुरुवातीपासूनच अभ्यास करायचा असा चंग बांधला जाई. पण ही आपली शिक्षण पद्धती आहे ती आम्हासारख्या अभ्यास करू इच्छीणाऱ्या मुलांच्या निश्चयावर पाणी फेरत असते. पहिल्या दिवसापासून अभ्यास हि ओढणीला बांधलेली गाठ सुटी लागल्यावर कधी सुटून जायची कळायचंही नाही. सुटीत अभ्यासाची सारी खुमखुमी उतरायची. झालं पुन्हा 'ये रे माझ्या मागल्या'. उद्यापासून नक्की अस म्हणता-म्हणता पुढची परीक्षा यायची. क़से पास झालो हे मला आजतागायत कळल नाही.

आमचे असायन्मेण्ट सबमिशन म्हणजे क्लास मधल्या स्कॉलर लोकांवर उपकारच असायचे. त्यांनी बिच्यारयांनी मर-मर मेहनत करून, घाम गाळायचा आणि आमच्यासारखे फुकटे शेवटी त्यांच्यासमोर केविलवाणा चेहरा करून हात पसरून उभे. आमच्या 'निरागस' चेहऱ्याकडे पाहून समोरच्याला दया येवून आमच्या झोळीत काही बाही पडायचंच. मग काय रात्रीतून कॉपी पेस्ट आणि असायन्मेण्ट सबमिट.

क्लास टेस्ट मध्ये तर कसे बसे काठावर पास याची सवय लागल्यामुळे 'रोज मरे त्याला कोण रडे' या न्यायाप्रमाणे आम्ही कधी ते मनावर घेतलं नाही किंवा कधी खंतही केली नाही. आणि यापेक्षा थोड पुढे तरी जावूयात असा क्षुद्र विचारही कधी आमच्या मनाला शिवला नाही. आम्ही या बाबतीत फार समाधानी होतो. कधीच हावरेपणा केला नाही. मिळेल तेवढ झोळीत घालत गेलो. आणि यातच समाधान मनात गेलो.

आम्ही तर एवढेही पाण्यात नवतो. नावापुरते का होईना पण लेक्चर अटेन्ड करायचो पण काही महारथी असेही होते जे फक्त फायनल एक्झाम्सला दिसत असत आणि आम्हाला एकमेकांना विचारावं लागे की हे आपले क्लास-मेट्स आहेत?

पण जी धम्माल "कॉलेज डेज" मध्ये आली ती विसरणे अशक्य आता अजून काय काय धमाल आली ती सांगत बसन अयोग्य. कारण आमच्या मते ती धमाल असेल पण दुसर्या कोणा लेखी ती टगेगिरी असू शकते.
हे मोरपंखी दिवस हातातून वाळू निसटावी तसे निसटून गेले नी राहिल्या फक्त आठवणी.…. कधीही न विसरण्यासाठी.



5 comments:

  1. sunder aga amhi msc la asatana porini mala madhe ghetla ani rikshat basavla.....karan mo movie la jayla nahi mhanat hote.....exam ali joti 8 divasavar
    ..mhanun yana Masti picture pahaycja hota.....black ne tickey kadhun westendla stall madhe basun ha movie pahila ani ekeka dialouge var ekamekinchya tondakade pahat rahilo......ani konachi idea hoti mhanun nikitala fatke maraychech baki hote.....ani tya divashi amcha send off hota....sadya ghalun theatermadhe ......40 rs black ne ticket......asali maja aleli.....stall madhala public ani tyat movietlya ekeka dialoug var padlelya shittya ....

    baher padlyavar maza chalu zalela bhashan.....
    tari mi sangat hote abhyas kara.....manavar parinam hoil. ani porini parat tond band kela ani kahitari khauya mhanun hatelat nela.......ajun itakya goshti ahet ......pan amhi 6 jani parat kadhi ekatra alo nahi.....tuzya lekhamule mala maze divas aathavle amhi universityt morcha kadhalela.....fee kami kara mhanun .......kay thrilling hota sagla........Msc madhle divas soneri hote

    Archana Shete

    ReplyDelete
  2. Replies
    1. 2nd last para tuzhyasathi hota prapra 😁😁

      Delete